कधीतरी तुलाही माझ्याचसारखा प्रेम व्हाव.
मी नाही म्हणत....
तू फक्त माझ असाव... पण माझ्या जीवनात
मात्र तुझ्याखेरीज कुणी नसाव... ♥
मी नाही म्हणत....
तू मलाच आठवावं..पण तू मात्र सदैव
माझ्या स्मरणात रहाव..♥
मी नाही म्हणत....
तू मला मनात ठेवाव... पण
माझ्या मनी मात्र तूच वसाव...♥
मी नाही म्हणत....
तू माझ्यासाठी रडावं....पण
माझी पापणी मात्र
तुझ्याचसाठी भिजाव..♥
मी नाही म्हणत....
तू मला प्रेम कराव... पण
कधीतरी तुलाही माझ्याचसारखा प्रेम
व्हाव...♥ —
Comments
Post a Comment