Review: Micromax A110 (in marathi)

नमस्कार मिञानो
आज मी review करणार आहे नवीन Micromax A110 चा. Micromax ही मोबाईल उत्पादन कर‌णारी भारतीय कंपनी असून तिचा A110 Canvas 2 सध्या मोबाईल बाजारात धुमाकूळ घालत आहे. एक उत्कृष्ट बजेट smartphone म्हणून A110 खुप लोकप्रियता मिळवली आहे. 

Display
A110 चा अतिशय मनमोहक असा 5" चा IPS; Capactive डिस्प्ले असून 480X854 चा FWVGA रेझोल्यूशन आहे. डिस्प्ले हा 16M  कलर चा असल्याने विडीओ बघण्यास व गेम्स करिता एकदम झकास आहे.

Camera
A110 च्या मागील बाजूस 8MP चा autofocus कँमेरा
असून सोबत 2 LED फ्लॅश आहेत. हा कँमेरा 720p@30fps या रेझोल्यूशन पर्यंत विडीओ शूट करू  शकतो.  इमेज  quality  8MP  एवढी  नसली  तरी उत्तम आहे. पुढील बाजूस 0.3MPचा   front facing VGA कँमेरा विडीओ कॉल साठी आहे.

Processor & Memory
A110  ला Mediatek च्या Dual-Core 1GHz Arm v7 cortex A9 या प्रोसेसर चे बळ देण्यात आले आहे व Power SGX 531 चा GPU देखील आहे.
A110 ची inbuilt मेमरी 4GB असून 512MB चा RAM आहे व अँप्स स्टोरेज 503MB आणि युझर साठी 2.05GB आहे व उर्वरीत सिस्टम मेमरी म्हणून वापरण्यात आली आहे.  पण तुम्ही microSD कार्ड द्वारा 32GB पर्यं त वाढवू शकता.

OS  & Media
A110 हा गुगल च्या Android आईसक्रिम सँडविच 4.0.4 ऑपरेटिंग सिस्टिम वर चालतो. यामध्ये जवळपास सर्व  मिडीया फाइल्स चालतात (1080p वगऴता)

Connectivity & Sensors
A110 हा ड्युअल सिम मोबाईल आहे यातील पहिला सिम हा 3G तर दुसरा 2G आहे. 3G व्यतिरिक्त WiFi, EDGE, GPRS, GPS with A-GPS, Bluetooth 4.0, Micro USB यांसारखे  connectivity  ऑप्शन्स आहेत
Accelometer, Proximity sensor, Digital compass, g-sensor व LED Notification  इत्यादि सेंसर आहेत.

Price tag & conclusion
Micromax A110 Canvas 2 याची मार्केट किंमत ₹ 9999/- आहे.  कमी किंमतीत फिचर पँक मोबाईल म्हणून Canvas 2 ची निवड करण्यात हरकत नाही...........्

Comments

Popular posts from this blog

Cyanogenmod 10.1 Review